|
पाषाणपुरुष (१९७९)
सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार हेन्री जेम्स यांच्या वॉशिंग्टन स्क्वेअरवर आधारलेली, पण याचं कथानक खरं तर भारतीय वातावरणाशी जुळणारं. श्रीमंत घरात वाढलेली सामान्य रूपाची, बुद्धीची मोहना आणि त्याचा फायदा घेऊन तिच्याशी नातं जोडू पाहणारा नितीन. काय खरं? प्रेम की पैसा?
माणसांच्या मनातील बारीक सारीक घटनांचा मागोवा घेऊन, संघर्ष हळूवार टिपणारी ही कादंबरी वाचकांना नेहमीच मोहनासारखी मोह घालते.
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे |
|
|
जस्मिन
जस्मिन, एक जगावेगळी स्त्री आणि तिचं स्वतंत्र जग. तिच्या आयुष्यात आलेल्या बर्फाळ वादळाची ही एक तुफानी कथा. एच.इ.बेट्स या गाजलेल्या कादंबरीकाराच्या ‘ट्रिपल एको’चे पडसाद माझ्या मनावरही असेच तुफानाप्रमाणे धडकले आणि त्यातून साकार झाली ही देशाच्या सीमेवरची
वादळी प्रेमकथा.
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे |
|
|
होरपळ (१९८४)
होरपळ (१९८४) ही माझी चौथी कादंबरी. माणसातल्या नात्याचा शोध घेणारी. प्रेम आणि तिरस्कार हे विरोधी शब्द की समानार्थी? गळ्यात गळे घालणारी सख्खी भावंडं एकमेकांच्या जीवावरही उठू शकतात? खिळखिळ्या पायावर आणि लटपटत्या भिंतींच्या आधारावर उभ्या असलेल्या घराला सावरू पाहणारे आई आणि वडील! अपार मायेपोटी हा बाप अंधारवाटेवर उभ्या असलेल्या आपल्या पोरावर स्वतःचे आयुष्य संपवून पैशाची छत्रछाया धरतो. प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटेल अशी ही होरपळणार्या माणसाची जीवघेणी कथा!
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे |
|