अपौरुषेय
जाई कुठली?
दारात लावले मी स्वतःलाच
हजारो पेरातून
फुटले बहरले
घरात घुसमटलेले श्वास
फुलाफुलातून मोकळे केले
पाकळीवरचे अश्रू
कुणाला दिसले?
अन्वय
एकेक माणसांचे तीर
पार करता करता
अर्धे अधिक आयुष्यच
डोक्यावरून बुडून गेले
बाई डॉट कॉम
प्रत्येक पिढीगणिक
उसवत जातो एकेक धागा
आणि माणसे सैलावतात
थोडी रुढीच्या बंधनातून
मात्र ती कधीच होत नाहीत मुक्त
एकेक नवी शिवण बसत असते नव्या रूपाने
आणि बद्ध होत जाते बाई
नव्या रूढी बंधनानं