बालकुमार साहित्य
मोठयांसाठी कितीतरी पुस्तके लिहिली तरी छोटया वाचकांसाठी लिहिणे हे मोठेच आव्हान असते आणि या लेखनातून मिळणारा आनंदही काही विशेष निरागस!
Jaducha Kantha जादूचा कंठा
राजकन्या, राजपुत्र, भुताटकी, जादू, लढाई आणि मग गोड शेवट अशी छोटीशी कादंबरीका वाचायला कुणाला आवडत नाही?
Bilandar Barikrao बिलंदर बारीकराव (२०१५ पर्यंत ४ आवृत्त्या)
धमाल विनोदी, बिलंदर, भांडकुदळ, लबाड, चोरटया, जादुगार माणसांच्या आणि हो प्राण्यांच्याही मजेशीर लोकप्रिय कथांचा संग्रह
Tumchya Awadtya Katha तुमच्या आवडत्या कथा
आपल्या देशातल्या लोककथा आपल्याला आवडतातच पण आपल्या आसपासच्या देशातल्या या मनोरंजक गोष्टी धम्मक लाडू चापट पोळ्याबरोबर अगदी गोड लागतील. चाखून बघाच.
Sari Devachi Lekare सारी देवाची लेकरे
(प्रथमावृत्ती १९८९, त्यानंतर अनेक आवृत्त्या) भारत आणि चीना- हो म्हणजे भारत आणि चीन –दोघे सख्खे शेजारी पण भांडणारे, भारत पशुपक्ष्यांवर प्रेम करणारा तर चीन त्यांचे भक्षण करणारा. वाचाच, सगळ्या पशूपक्ष्यांनी एकत्र येऊन काय धमाल केली ते! निसर्गावर, पशूपक्ष्यांवर प्रेम करायला शिकवणारी एक शानदार कादंबरीका.
Gharkombada घरकोंबडा
शहरात वाढलेला, घराच्या चार भिंतीत केवळ अभ्यासापुरतंच जग माहीत असलेला आतिश मोकळ्या जगात येतो ...आणि वाचाच...कशी फटफजिती होते. तो निसर्ग वाचायला शिकतो.
Ek Hote Zaad एक होते झाड (२०१० तिसरी आवृत्ती)
रामू आणि त्याचं आंब्याचं झाड! दोघांचं अनोखं नातं. पण रामूनं त्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या मुळावरच घाव घातला. तुम्ही नष्ट केलंत, तरी तुम्हाला सतत देत राहणार्‍या झाडाची अनोखी कथा.
Dusaryasathi Jagalas Tar दुसर्‍यासाठी जगलास तर
छोटया दोस्तांनो, तुम्ही सगळेच शूरवीर असता पण तुम्हाला साहस दाखवण्याची संधी मिळत नाही. तनू आणि सदाफुली – प्रसंग येताच आपल्या अंगातील जिद्द, साहस आणि शौर्य दाखवून दुसर्‍यांचे प्राण वाचवणार्‍या दोन दोस्तांच्या साहसकथा प्रत्येकालाच स्फूर्ती देतील.
Yashchya Kalpak Katha यशच्या कल्पक कथा (चौथी आवृत्ती २०१२)
बालकुमार साहित्य संमेलनाचा दयार्णव कोपर्डेकर उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार मिळवणार्‍या या कथा आहेत. ‘फँटसी’ म्हणजे कल्पनेच्या जगातल्या! स्वप्नांच्या जगाला कल्पनेचे पंख असतात आणि आपल्या मनासारख्या गोष्टी घडवून आणण्याचं सामर्थ्य असतं. संगणकाच्या या युगातला बुद्धीमान मुलगा यश कधी गॉडझिला होतो तर कधी स्वतःची डमी, कधी मांजर तर कधी पक्षी. आपल्याला हवं ते बनू शकणार्‍या या वंडरबॉयच्या कथा अगदी ‘मस्ट; हं!
Sudarshana ani Itar Katha सुदर्शना आणि इतर कथा (२०१२)
पाळणाघरातून आलेल्या सुदर्शनाला आई सापडली, अॅलिस इन वंडरलँड वाचता वाचता आभा पाहता पाहता छताएवढी उंच झाली. एकदा तर छोटी आभा एकदम कॉलेजात जाणारी मुलगीच झाली. एकापेक्षा एक सुंदर सुंदर सहा कथांचा खजिनाच.
Adarsha Lakshadhish आदर्श लक्षाधीश
मुलांना वाचता वाचता खुदकन हसवणार्‍या तर कधी डोळ्यात पाणी आणणार्‍या इंग्रजी साहित्यातल्या या अभिजात कथा मराठीतून प्रथमच वाचत असाल.
Pashanpurush अल्बर्ट आईनस्टाईन आणि इतर कथा
इंग्रजीमध्ये गाजलेल्या लहान मुलांसाठीच्या इतक्या सुंदर संस्कारक्षम कथा, पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा.

छान छान नाटुकली (१९७३)
पर्‍या, फुले यांच्या काल्पनिक राज्यात घडणार्‍या तीन छोट्या प्रयोगक्षम एकांकिकांचा संग्रह

मजेदार गोष्टी
नावाप्रमाणेच मजा मजा करणार्‍या सुंदर गोष्टींचा संग्रह

झुक झुक पाँग पाँग
कविताच पण नेहमीच्या थाटातल्या नव्हे. या आजच्या मुलांच्या आजच्या विषयावरच्या आधुनिक कविता आहेत.

४ द्विभाषिक पुस्तके


इंग्रजीतल्या ६ चित्र-पुस्तकांचे लेखन


Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.