सार्वजनिक कार्य

 • बृहन महाराष्ट्रामध्ये महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक संस्था, स्त्रियांची मंडळे यामध्ये स्त्रियांचे प्रश्न व स्त्रियांचा दर्जा या संबंधित सुमारे २०० हून अधिक व्याख्याने
 • आत्तापर्यंत सर्व प्रतिष्ठित कवी संमेलने व साहित्य संमेलने यातून सुमारे २०० ठिकाणी कवितावाचन
 • देवाशप्पथ खरं सांगेन या चित्रपटाची पटकथा, संवाद व गीतलेखन
 • दे धडक बेधडक या चित्रपटाची गीते
 • महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न, व्याख्यानमाला व अन्य उपक्रम
 • मराठीतील सर्व वृत्तपत्रे, मासिके यामधून नियमितपणे कथा, कविता, समीक्षा, लेख प्रसिद्ध.
 • काही वृत्तपत्रातून तरुणांच्या प्रश्नांवर नियमित सदर लेखन.
 • सर्व प्रतिष्ठित दिवाळी अंकात लेख व कविता
 • महाराष्ट्र टाईम्स - सगुण निर्गुण सदर लेखन: २०१४
 • लोकसत्ता चतुरंग पुरवणी - अजुनी चालतेची वाट- सदर लेखन- वर्षभर २०१५
 • ‘इन देअर ओन व्हॉयसेस' या पुस्तकात अर्लीन झाईड या अमेरिकन संपादिकेने दोन कवितांचा समावेश केला आहे
 • लँग्वेज अँड जेन्डर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात एका कवितेचा समावेश
 • सर्वभाषिक अखिल भारतीय कवीसंमेलनात 'पाण्याच्या जातीची' या कवितेची निवड (२००६).
 • या कवितेचे २२ भाषात २६ जानेवारी रोजी आकाशवाणीवरून प्रसारण
 • मराठी वाड्.मयाचा इतिहास (खंड ७ वा) या ग्रंथात स्त्रीवादी साहित्याच्या इतिहासाचे लेखन २००९ (प्रकाशक: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे)
 • कर्नाटकातील मराठी पाठ्यपुस्तकात कविता
 • म.सा.प. वारजे कोथरूड शाखा: अध्यक्ष
 • दिलीपराज वृत्त चे जानेवारी २०१५ पासून दरमहा संपादन

Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.
Designed and developed by Piton Systems