अनुवादित
Sadakchaap सडकछाप( २००८) मूळ लेखक- मेहेर पेस्तनजी
जितकी हृदयस्पर्शी तितकीच अंगावर काटा आणणारी सडकछाप ही कादंबरी रस्त्यावरच्या मुलांचं अमानुष जिणं, कठोर वास्तव आणि अपार सहानुभूतीसह व्यक्त करते. हे भणंग जीवन, इथून सुटका नाही, आपल्या छोटयाशा इच्छा आणि लहानशी स्वप्नं यांचा आनंद लुटत असतानाच तो गुन्हेगारी, क्रौर्य आणि एकाकीपणाच्या भोवर्‍यात सापडतो. जीवनप्रवाहात हरवलेल्या एका मुलाची कहाणी भारतातल्या हजारो मुलांचं प्रतिनिधित्व करते.

Sadakchaap अँबुश (दबा धरून हल्ला)
आपले स्वातंत्र्य मौल्यवान समजणाऱ्या प्रत्येक भारतीयाने अभिमानाने वाचायला हवे –
हा कथासंग्रह प्रत्यक्ष जीवनातील घटनांवर आधारित आहे. निवडणुकीतील राजकारण, या अविश्वसनीय घटनेची पार्श्वभूमी त्याला लाभली आहे. ज्या राष्ट्राने परकीय अमलाखाली कष्ट उपसले, त्या गरीब विकसनशील देशात लोकशाही निवडणुकांचे यश हा चमत्कार मानावा लागेल.
पण स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी कोट्यावधी भारतीय हे गृहीत धरू लागले की निवडणूकही श्वासोछ्वासाइतकीच आपल्या जीवनाचा एक भाग आहे. मुक्त वातावरणात निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात म्हणून ज्या प्रचंड आव्हानांना निवडणूक आयोग तोंड देतो, त्याची कल्पना फार थोड्यांना असते. तरी भारतीय राज्यघटनेने निवडणूक आयोगाला इतक्या स्वायत्तत्तेची ग्वाही दिली आहे की एकदा निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की न्याय व्यवस्थाही त्यात ढवळाढवळ करू शकत नाही.
हे पुस्तक आपल्याला पडद्यामागची दृश्ये दाखवते. ज्यांचे कौतुक होत नाही, अशा निवडणूक कर्मचाऱ्यांनी पेललेली असामान्य आव्हाने आणि त्यावर केलेली मात यांचे त्यातून ओझरते दर्शन घडते. मतदान केंद्रावरचे कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थापन, उमेदवार, पत्रकार, पोलीस आणि सर्वात मुख्य म्हणजे भारतीय मतदाते या सामान्य लोकांच्या या कथा आहेत. जगातील अतिशय गुंतागुंतीच्या आणि अवघड अशा या निवडणुका नीट पार पाडण्यासाठी त्यांनी अतुलनीय धैर्य व कर्तव्याप्रति अढळ निष्ठा आचरणात आणली.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या निरंतर शोधात असलेल्या मानवी चैतन्याच्या विजयाचा हे पुस्तक सन्मान करते.

Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.