banner
आगामी...
  • 'स्त्रीसूक्त' कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद
    'द फेमिनाईन ओड '
  • इंग्रजीतल्या ६ चित्र-पुस्तकांचे लेखन
  • मराठी मधल्या वाङ्मयाचे इंग्रजी मध्ये भाषांतर
  • दिलीपराज वृत्त चे जानेवारी २०१५ पासून दार महा संपादन
 
अपौरुषेय
जाई कुठली?
दारात लावले मी स्वतःलाच
हजारो पेरातून
फुटले बहरले
घरात घुसमटलेले श्वास
फुलाफुलातून मोकळे केले
पाकळीवरचे अश्रू
कुणाला दिसले?
अन्वय
एकेक माणसांचे तीर
पार करता करता
अर्धे अधिक आयुष्यच
डोक्यावरून बुडून गेले
बाई डॉट कॉम
प्रत्येक पिढीगणिक
उसवत जातो एकेक धागा
आणि माणसे सैलावतात
थोडी रुढीच्या बंधनातून
मात्र ती कधीच होत नाहीत मुक्त
एकेक नवी शिवण बसत असते नव्या रूपाने
आणि बद्ध होत जाते बाई
नव्या रूढी बंधनानं
पत्ता :
‘शरण्य', ४७, स्वेदगंगा सोसायटी
वारजे, पुणे ४११०५२
फोन : ०२०-२५२३०७५९, २५२३०८१६
भ्रमणध्वनी : ९९७५६१३१३८
email : ashwinid2012@gmail.com
Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.
Designed and developed by Piton Systems